Mazi kanya bhagyashree yojana 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण माझी कन्या भाग्यश्री योजनेबद्दल ही माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आजही काही भागात मुलगा आणि मुलगी असा भेदभाव आपल्याला पाहायला मिळतो मुलीचा जन्मदर वाढवणे त्यांच्या शिक्षणाला चालना देणे आणि बालविवाह रोखणे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने माजी कन्या भाग्यश्री योजना सुरू केलेली आहे ही योजना केवळ आर्थिक मदत करत नाही तर मुलींना समाजात सन्मानाने जगण्यासाठी एक भक्कम आधार देते तर तुमच्या घरी चिमुकलेचे आगमन झाले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आज आपण या बद्दलची सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत.
ही योजना काय आहे Mazi kanya bhagyashree yojana 2026
Mazi kanya bhagyashree yojana 2026 तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत योजना एक एप्रिल 2016 पासून सुधारित स्वरूपात लागू करण्यात आलेली आहे या योजनेची पूर्वीचे नावे सुकन्या योजना असे होते आता याच योजनेचे नाव माझी कन्या भाग्यश्री ही योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या जन्माचे स्वागत करणे आणि त्यांच्या पालकांना हार्दिक सुरक्षितता प्रदान करणे हा आहे. जेव्हा एखाद्या कुटुंबात मुलगी जन्माला येते तेव्हा शासन तिच्या नावे बँक ठराविक रक्कम मदत ठेव म्हणून ठेवते ही रक्कम मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर तिला व्याजासह मिळते याचा उपयोग ती उच्च शिक्षण किंवा स्वतःच्या पायावर ती उभा राहण्यासाठी करू शकते.
या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत हे कुटुंबातील मुलांच्या संख्येवर आणि कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेवर अवलंबून असते जसे की एका मुलीच्या बाबतीत जर एखादा दांपत्याला पहिली मुलगी झाली आणि मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत माता किंवा पित्याचे कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली तर शासनाकडून त्या मुलीच्या नावे 50 हजार रुपये पर्यंत मोजत ठेव म्हणून बँकेत जमा केले जातात.
shaktipeeth highway news | महाराष्ट्रातील या जिल्ह्यातून व तालुक्यातून जाणार नवीन महामार्ग..!
Mazi kanya bhagyashree yojana 2026 तसेच दोन मुलींच्या बाबतीत जर पहिलाच गेले तर जर एखाद्या कुटुंबात दोन मुली असतील आणि दुसऱ्या मुलीचा जन्म नंतर सहा महिन्याच्या आत पालकांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली तर दोन्ही मुलांची नावे प्रत्येकी 25 25 हजार रुपये जमा केले जातात तसेच यामध्ये व्याजाचा लाभ देखील देण्यात येतो मुलींचे नावे जमा केलेल्या या रकमेवरती मिळणारे व्याज ठराविक टप्प्यावर काढता येते मुलीचे वय सहा वर्ष आणि बारा वर्षे झाल्यावर जमा झालेली व्याज काढण्याची मुभा असते जेणेकरून तिच्या शालेय शिक्षणाचा खर्च भागवता येईल.
तसेच जेव्हा मुलगी 18 वर्षाची होते आणि तिने दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असते तेव्हा तिला व्याजासह संपूर्ण रक्कम मिळते ही रक्कम साधारणता एक लाख रुपयांच्या आसपास असते त्यामध्ये व्याजदर देखील दिले जाते.
पात्रता व निकष Mazi kanya bhagyashree yojana 2026
तर मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता व निकष पूर्ण आवश्यक आहे जसे की अर्जदार कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच पूर्वी या योजनेसाठी केवळ बीपीएल राशन कार्ड कुटुंबांनाच लाभ मिळत असे परंतु आता शासनाने नियमात बदल केलेला असून ज्या कुटुंबांची वार्षिक उत्पन्न साडेसात लाख रुपयापर्यंत आहे अशी सर्व कुटुंबे या योजनेसाठी पात्र आहेत तसेच योजनेचा लाभ केवळ दोन मुलीपर्यंतच मर्यादित आहे जर तिसरी अपत्य झाले तर त्या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच मुलींचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा तिचा झालेला विवाह जर बालविवाह झाला तर योजनेचे पैसे मिळणार नाहीत तसेच मुलगी आणि तिची आई याचे बँक ऑफ महाराष्ट्र किंवा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत संयुक्त खाते असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे Mazi kanya bhagyashree yojana 2026
- मुलीचा जन्म दाखला
- पालकाचे आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रेशन कार्ड
- बँक पासबुक
- कुटुंबाची नियोजन प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- प्रतिज्ञापत्र
अर्ज प्रक्रिया
तर मित्रांनो सर्वात आधी तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविका किंवा ग्रामपंचायत कार्यालय तसेच तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधावा लागेल तिथे तुम्हाला विविध नमुन्यातील अर्ज प्राप्त करावा लागेल व माहिती भरून अर्जात विचारलेली सर्व माहिती जसे की पालकाचे नाव मुलीचे नाव जन्मतारीख बँक खाते क्रमांक इत्यादी अचूक माहिती भरावी लागेल तसेच वरील दिलेली सर्व कागदपत्रे त्यासोबत तोडावी लागतील व भरलेला अर्ज आणि कागदपत्रे तुमच्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे किंवा थेट जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात जमा करावी लागतील तसेच जमा केल्यानंतर त्याची पोच पावती तुम्हाला मिळेल तुमचा अर्ज भरलेला असेल.
योजनेचे उद्दिष्टे Mazi kanya bhagyashree yojana 2026
तर मित्रांनो भारत सरकारने बेटी बचाव बेटी पढाव हा नारा दिलेला आहे यात संकल्पनेतून याला मूर्ती रूप देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना आलेली आहे या योजनेद्वारे मुलींच्या जन्माबद्दल समाजात सकारात्मक निर्माण होत आहे गरीब आणि मध्यमवर्गीय पालकांना मुलींच्या शिक्षणाची आणि लग्नाची चिंता सतावत नाही. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यास मदत होते आणि मुलींना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्याची संधी मिळत आहे त्याचबरोबर माझी कन्या भाग्यश्री योजना ही राज्यातील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी आलेली एक क्रांतिकारक योजना असून जर तुमच्या कुटुंबात किंवा परिचयात कोणी पात्र लाभार्थी असेल तर त्यांना या योजनेची माहिती नक्की द्या शासकीय योजनेचा लाभ वेळेत घेतल्यास मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
अशा नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!